Thursday, July 02, 2009
"लाज वाटते...लाज वाटते मराठी म्हणुन जन्मल्याची लाज वाटते."
लाज वाटते...लाज वाटते मराठी म्हणुन जन्मल्याची लाज वाटते...फ़ुटक्या कवडीची किम्मत नसलेला...मी...मी मराठी माणुस...अटकेपार झेंडे लावले...ते फ़ाटुन आता दांडके उरलेत दांडके...दांडके जे आमच्याच ढुंगणावर वापरले जातयेत..
साला आम्ही खेकडे...आम्ही गांडुळ...अरे पण खेकड्याला मासळीबाजारात किम्मत आहे...गांडुळखताला आज मागणी आहे...पण मराठी माणसाला कशाचीसुद्धा किम्मत नाही....
छे छे...ही तुमची ऐपत नाय...तो तुमचा घास नाय...तुम्ही डाऊन मार्केट...तुम्ही मीन माईंडेड...तुमची प्रोपर मुंबईत रहायची लायकी नाही...
साला मराठी माणुस रोगापेक्शा धसक्यानेच मरतो...धसका पोरानं राडा केल्याचा...धसका पोरी पंजाब्याबरोबर पळुन गेल्याचा...धसका गावाकडची जमीन चुलत्यानं गिळल्याचा....धसका मुंबई महाराष्ट्रापासुन तुटण्याचा....धसका भूतकाळाचा....वर्तमानकाळाचा आणि भविष्याचा...
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती काय...?? अरे आम्हाला तर सगळ्यांचीच भिती....
मराठी पाऊल पडते पुढे...अरे हट्ट्ट....मराठी पाऊल पडतच आहे कुठे...अरे मुळात..मराठी पाऊल ऊरलच आहे कुठे...???
Subscribe to:
Posts (Atom)